Facebook SDK

नमस्कार मित्रांनो या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. या ब्लॉग वर आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन छान छान गोष्टी, प्रेरणादायक गोष्टी, मराठी गोष्टी शेअर करत असतो. या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी खूप छान छान गोष्ट घेऊन आलोय. छान छान गोष्टी म्हणजे सगळ्यांचाच आवडता विषय. पऱ्यांच्या गोष्टी, जादूच्या गोष्टी, लहान मुलांसाठी गोष्टी, नवीन गोष्टी, नवीन मराठी छान छान गोष्टी सगळ्यांना वाचायला आवडतात. आज आपण कोल्हा आणि कावळा यांची मजेशीर गोष्ट पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया...


चतुर कोल्हा आणि मूर्ख कावळ्याची गोष्ट.


एका जंगलात कोल्हा आणि एक कावळा राहत होता. कोल्ह्याला खूप भूक लागली होती. भूक भागवण्यासाठी तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला. संपूर्ण जंगलात भटकंती करूनही त्याला काहीही सापडले नाही तेव्हा त्याने संपूर्ण जंगलाची चाचपणी केली. उन्हाने आणि भुकेने त्रस्त होऊन तो एका झाडाखाली बसला. अचानक त्याची नजर वर गेली आणि झाडावर एक कावळा बसलेला दिसला. त्या कावळ्याच्या तोंडामध्ये एक भाकरीचा तुकडा होता. कावळ्याच्या तोंडात भाकरीचा तुकडा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

तो कोल्हा कावळ्याकडून भाकरीचा तुकडा हिसकावण्याचा विचार करू लागला. अचानक त्याला एक उपाय सुचला आणि मग तो कावळ्याला म्हणाला - "कावळा भाऊ, कावळा भाऊ, तू खूप सुंदर आहेस. संपूर्ण जंगलात तुझ्यासारखा सुंदर कावळा नाही. मी तुझी स्तुती खूप ऐकली आहेत. तू खूप चांगले गातो मी ऐकले आहे. तुझ्या मधुर मधुर आवाजाचे सगळेच वेडे आहेत. मलाही तुझे गाणे ऐकायचे आहे तुझे मधुर गाणे तू मला ऐकवणार नाहीस का?" स्वतःची स्तुती ऐकून कावळा खूप खुश झाला. तो कोल्ह्याच्या गोड बोलण्यात आला. आणि विचार न करता त्याने गाण गाण्यासाठी तोंड उघडले. त्याने तोंड उघडताच भाकरीचा तुकडा खाली पडला.


भुकेल्या कोल्ह्याने घाईघाईने भाकरीचा तुकडा उचलला आणि जंगलात पळून गेला. हे पाहून कावळ्याला त्याच्या मूर्खपणाचा पश्चाताप होऊ लागला. पण आता काय खेद वाटावा. चतुर कोल्ह्याने आपल्या मुर्खपणाचा फायदा उचलून घेतला.


तात्पर्य: आपण आपली खोटी प्रशंसा नेहमी टाळली पाहिजे.

 
कधी-कधी आपल्याला असे अनेक लोक भेटतात. त्यांचे काम करून घेण्यासाठी ते आपली खोटी स्तुती करतात. आणि त्याचे काम संपल्यानंतर तो विचारतही नाही. त्यांचा स्वार्थ लक्ष्यात घेवून अश्या स्वार्थी लोकांपासून आपण दूर राहिले पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.


Post a Comment

Previous Post Next Post